जिल्हा नियोजन समिती निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची सोमवारी अंतिम मुदत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:39 IST2017-09-04T01:39:06+5:302017-09-04T01:39:45+5:30
वाशिम: जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) रिक्त असलेल्या तीन जागांकरिता १४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत असून, रिंगणात असलेल्या १0 उमेदवारां पैकी ५ सप्टेंबर या अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण माघार घेणार आणि कोण कायम राहणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा नियोजन समिती निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची सोमवारी अंतिम मुदत!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) रिक्त असलेल्या तीन जागांकरिता १४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत असून, रिंगणात असलेल्या १0 उमेदवारां पैकी ५ सप्टेंबर या अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण माघार घेणार आणि कोण कायम राहणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
लहान नागरी क्षेत्रातील रिक्त जागांसाठी नगर परिषद या म तदार संघातून ही निवडणूक होत असून, एकंदरित १0५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी २८ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होती. त्यानुसार, शेवटच्या दिवशी १0 उमेदवारी अर्ज दाखल झाले. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छाननी होऊन त्याच दिवशी दहाही उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. दरम्यान, ५ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या कालावधीत म तदान होणार आहे. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता पासून मतमोजणीस सुरुवात होईल. या निवडणुकीत वाशिम, रिसोड, मंगरूळपीर व कारंजा नगर परिषदेतील निर्वाचित १0५ सदस्य मतदार करण्यास पात्र आहेत.
निवडणूक रिंगणातील उमेदवार
अनु. जाती स्त्री प्रवर्गातून करुणा कल्ले (वाशिम), वर्षा इंगोले (कारंजा), संघमित्रा पाटील (मंगरूळपीर), प्रतिभा सोनोने (कारंजा) असे चार उमेदवार रिंगणात कायम आहेत.
नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गातून हिना कौसर मो. मुबश्शीर (वाशिम) व सविता इंगोले (वाशिम) हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून शे. अनिसाबी युनूस (कारंजा), रेखा शर्मा (वाशिम), सुमन परळीकर (मंगरूळपीर) व ज्योती लवटे (मंगरूळपीर) असे चार उमेदवार निवडणूक लढत असून, यांच्यापैकी ५ सप्टेंबरला कोण माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.