जलसुरक्षकांची जिल्हास्तरीय कार्यशाळा
By Admin | Updated: March 19, 2016 01:10 IST2016-03-19T01:10:21+5:302016-03-19T01:10:21+5:30
स्वच्छता व जलजागृती सप्ताह अंतर्गत जलसंवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

जलसुरक्षकांची जिल्हास्तरीय कार्यशाळा
वाशिम: जलसुरक्षक हे पाण्याचे संरक्षक असून, गावाला शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी त्यांची आहे. यासाठी लोकांनीही आपला सहभाग देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केले. स्वच्छता व जलजागृती सप्ताह अंतर्गत जिजाऊ सभागृहात गुरुवारी आयोजित जलसुरक्षकांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, वरिष्ठ भूवैज्ञानिक बलवंत गजभिये, साथरोग तज्ज्ञ कल्पना उरकडे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शेगावकर, उपअभियंता बेले, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचे विजय गवळी आदींची यावेळी उपस्थिती होती. जलसुरक्षकांनी पाण्याची शुद्धता राखण्याचे काम प्रामाणिकपणे करून या क्षेत्रात प्रावीण्य मिळवावे, असा सल्लाही पाटील यांनी दिला. प्रास्ताविक महेश पाटील यांनी केले. यावेळी सेलोकार, गजभिये, कल्पना उरकडे, शेगावकर, बेले, शंकर आंबेकर, विवेक राजूरकर यांनीही जलसुरक्षकांना मार्गदर्शन केले. पिंपळखुटा येथील जलमित्र उजेंद्र परंडे यांनीही आपल्या अनुभवांच्या आधारे विचार व्यक्त केले. संचालन पुष्पलता अफुने यांनी केले. आभार अभिजित दुधाटे यांनी मानले.