पशुधन विमा योजनेपासून जिल्हा वंचित

By Admin | Updated: December 8, 2014 01:34 IST2014-12-08T01:34:38+5:302014-12-08T01:34:38+5:30

पश्‍चिम व-हाडातील जिल्हे वंचित; पशुपालकांना फटका.

District deprived from livestock insurance scheme | पशुधन विमा योजनेपासून जिल्हा वंचित

पशुधन विमा योजनेपासून जिल्हा वंचित

वाशिम : शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखल्या जाणारा वाशिम जिल्हा अद्यापही पशुधन विमा योजनेपासून वंचितच आहे. याचा फटका जिल्ह्यातील पशुपालकांना सोसावा लागत आहे.
पशुधनाला विम्याचे सुरक्षा कवच मिळावे, शिवाय पशुधनाच्या कायमस्वरुपी अपंगत्व किंवा आकस्मिक मृत्यूमुळे होणार्‍या नुकसानापासून संरक्षण देणे व पशुधनात गुणात्मक सुधारणा करणे अशा दुहेरी उद्देशाने शासनाने सन २00६-0७ पासून पशुधन विमा योजना सुरू केली होती. सदर योजना केंद्र पुरस्कृत आहे. पशूंचे अपघाती निधन झाल्यास संबधित पशुपालकांना या योजनेच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळते. मात्र, पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, वाशिम व बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यांत शासनाने ही योजना सुरूच केलेली नाही. याचा फटका जिल्ह्यातील पशु पालकांना सोसावा लागत आहे.

Web Title: District deprived from livestock insurance scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.