जिल्हाधिकाऱ्यांनी केली सोयाबीनच्या अमरपट्टा पद्धतीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:38 IST2021-08-01T04:38:36+5:302021-08-01T04:38:36+5:30
केशवराव भगत यांच्याशी जिल्हाधिकारी यांनी बाेलतांना सांगितले की, यावर्षी सोयाबीन व तूर उत्पन्नाच्या नोंदी ठेवाव्यात. अमर पट्टा पद्धतीने सोयाबीन, ...

जिल्हाधिकाऱ्यांनी केली सोयाबीनच्या अमरपट्टा पद्धतीची पाहणी
केशवराव भगत यांच्याशी जिल्हाधिकारी यांनी बाेलतांना सांगितले की, यावर्षी सोयाबीन व तूर उत्पन्नाच्या नोंदी ठेवाव्यात. अमर पट्टा पद्धतीने सोयाबीन, तुरीची पेरणी केलेल्या सोयाबीनमध्ये आता तुरीचे शेंडे खुडणे हे काम करणे सोपे जात आहे . शिवाय या पद्धतीने पेरलेल्या सोयाबीनमध्ये रोग व किडीचा सुद्धा प्रादुर्भाव कमी आढळून येत आहे. त्यामुळे ही पद्धत शेतकऱ्यांसाठी निश्चित भविष्यात एक वरदान ठरणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या खरीप हंगामात अमर पट्टा पद्धतीने पेरणी केलेल्या शेतांना भेटी देऊन त्याची संपूर्ण माहिती घेऊन पुढील हंगामात आपणास याचा लाभ होऊ शकतो असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले यांनी केले आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी अंभोरे, कृषी सहाय्यक सांगोडे, अमोल हीसेकर, सतीश राऊत तसेच जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, प्रगतीशील शेतकरी दिलीप फुके व परिसरातील शेतकरी हजर होते.