स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:46 IST2021-07-14T04:46:39+5:302021-07-14T04:46:39+5:30

सोमवारी स्त्री रूग्णालयाला खासदार गवळी यांच्या हस्ते व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी कोणतेही मेडिकल साहित्य लागल्यास आपण सदैव ...

Distribution of ventilator in women's hospital | स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचे वितरण

स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचे वितरण

सोमवारी स्त्री रूग्णालयाला खासदार गवळी यांच्या हस्ते व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी कोणतेही मेडिकल साहित्य लागल्यास आपण सदैव आरोग्य सेवेसाठी तत्पर आहोत असे त्या म्हणाल्या. रूग्णालयाच्या आवारात खासदार गवळी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजसिंग पवार, ॲड. शामराव उंडाळ, डॉ. विवेक साबु , डॉ. थोरात, डॉ. अनिल कावरखे, डॉ. हरिष बाहेती, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, डॉ. राम हजारे, डॉ. अमित बिडवे, नगरसेवक ॲड. विनोद खंडेलवाल, शिवसेना तालुका प्रमुख रामदास मते पाटील, युवा सेना शहरप्रमुख गजानन ठेंगडे, युवा सेना प्रसिद्धी प्रमुख नारायण ठेंगडे, रवी गोरे, रेखा घुले,सहायक अधिसेविका उषा भोसले,औषध निर्माण अधिकारी विशाल काकडे,जिल्हा आरोग्य ड्रेसर शेख वसीम शेख नसीर यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक व संचालन तंबाखू नियंत्रक राम सरकटे यांनी केले.

Web Title: Distribution of ventilator in women's hospital