१.२२ लाख शेतक-यांना ‘सॉइल हेल्थ कार्ड’चे वाटप
By Admin | Updated: May 2, 2016 01:48 IST2016-05-02T01:48:43+5:302016-05-02T01:48:43+5:30
पालकमंत्री पाटील यांनी घेतला वाशिम जिल्हय़ाच्या विकासाचा आढावा.

१.२२ लाख शेतक-यांना ‘सॉइल हेल्थ कार्ड’चे वाटप
वाशिम : शेतकर्यांना त्यांच्या जमिनीची प्रत समजावी, खतांचा वापर व पीक निश्चिती करणे सोपे व्हावे, यासाठी सर्व शेतकर्यांना 'सॉइल हेल्थ कार्ड' देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ६७0 शेतकर्यांना सॉइल हेल्थ कार्डचे वाटप केले आहे. या खरीप हंगामापासून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू होत असून, शेतकर्यांना ही विमा योजना अतिशय फायदेशीर ठरणार असल्याचा आशावाद पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. डॉ. पाटील यांनी यावेळी ध्वजारोहण केले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, नगर परिषद अध्यक्ष लता उलेमाले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक अंबादास गांगुर्डे यांच्यासह अधिकारी-पदाधिकार्यांची उपस्थिती होती. डॉ. पाटील म्हणाले, की गत वर्षी झालेल्या अपुर्या पावसामुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतीतील उत्पन्न घटल्याने संकटात सापडलेल्या शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील गावांमधील शेतकर्यांच्या पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याचा व सहकारी पीक कर्जाच्या पुनर्गठण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचबरोबर जमीन महसूल व वीज बिलात सूट, टँकरने पाणीपुरवठा करणे व कृषिपंपाची वीज जोडणी खंडित न करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील २ लाख ४६ हजार ५३२ शेतकरी लाभार्थींना २ रुपये प्रतिकिलो दराने गहू व ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ दिले जात आहे. तसेच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ आजपयर्ंत ८८५ शेतकर्यांनी घेतला आहे.