समृद्ध गाव स्पर्धेतील गावांना पर्जन्यमापक यंत्राचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST2021-07-21T04:26:58+5:302021-07-21T04:26:58+5:30
समृद्ध गाव स्पर्धाअंतर्गत मिनी स्पर्धेत पात्र ठरलेल्या कारंजा तालुक्यातील दोनद बु. आणि मंगरूळपीर तालुक्यातील पिंपरी खुर्द या गावचे सरपंच ...

समृद्ध गाव स्पर्धेतील गावांना पर्जन्यमापक यंत्राचे वितरण
समृद्ध गाव स्पर्धाअंतर्गत मिनी स्पर्धेत पात्र ठरलेल्या कारंजा तालुक्यातील दोनद बु. आणि मंगरूळपीर तालुक्यातील पिंपरी खुर्द या गावचे सरपंच व वॉटर हिरो यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र, मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी समृद्ध गाव स्पर्धेचा एक भाग म्हणून ‘सोयाबीन डिजिटल शेती शाळा’चे आयोजन करण्यात येत आहे. या शेतीशाळेवर आयोजित ‘सोयाबीन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम विजेता ठरलेल्या कौतिक विजय ढवळे यांना पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते सायकल कोळपे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पानी फौंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
०००००
‘सन्मार्ग’ माहिती पुस्तिकेचे विमोचन
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांच्या योजनांविषयी माहितीचा समावेश असलेल्या ‘सन्मार्ग’ पुस्तिकेचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते विमोचन करण्यात आले. अनुसूचित जाती उपयोजना २०२०-२१ अंतर्गत वाशिम जिल्हा माहिती कार्यालयाने प्रकाशित केलेल्या ‘सन्मार्ग’ पुस्तिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, कृषी स्वावलंबन योजना, दुभत्या जनावरांचे गट वाटप, मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, निवासी शाळा, परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती यासह विविध योजनांच्या अटी व लाभाच्या स्वरूपाबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.