परशुराम युवा मंचतर्फे खिचडीचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:39 IST2021-05-15T04:39:19+5:302021-05-15T04:39:19+5:30
परशुराम युवा मंचच्या वतीने दरवर्षी भगवान परशुराम यांची जयंती मोठ्या उत्साहात व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात येते; ...

परशुराम युवा मंचतर्फे खिचडीचे वितरण
परशुराम युवा मंचच्या वतीने दरवर्षी भगवान परशुराम यांची जयंती मोठ्या उत्साहात व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात येते; परंतु यावर्षी कोरोना महामारीचे संकट लक्षात घेऊन अत्यंत साध्या पध्दतीने घरोघरी जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त खिचडी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांच्या नातेवाइकांना व शहरातील गोरगरिबांना खिचडीचे वाटप करण्यात आले. उपक्रम यशस्वीतेसाठी अशितोष निरखी, गिरीश शर्मा, संतोष लक्रस, गजानन काळबांडे, राम शर्मा, सारंग शर्मा, पवन शर्मा, विश्वास ब्रह्मेकर, अभिषेक भुरे, वैभव इंगळे, गोपाल शर्मा, राधेश्याम शर्मा, कृष्णा इंगळे, अभिषेक कंकाळ, गणेश खंडाळकर आदी पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेतला.