मानोऱ्यातील ७० मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST2021-09-26T04:45:07+5:302021-09-26T04:45:07+5:30

‘लाइट ऑफ लाइफ ट्रस्ट’ व ‘शेअर अँड केअर फाउंडेशन’ संयुक्तपणे मागील अकरा वर्षांपासून अनाथ, एकल पालकतत्व, आदिवासी आणि दुर्लक्षित ...

Distribution of free educational materials to 70 children of Manora | मानोऱ्यातील ७० मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

मानोऱ्यातील ७० मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

‘लाइट ऑफ लाइफ ट्रस्ट’ व ‘शेअर अँड केअर फाउंडेशन’ संयुक्तपणे मागील अकरा वर्षांपासून अनाथ, एकल पालकतत्व, आदिवासी आणि दुर्लक्षित दुर्गम भागातील गरीब मुलांसाठी सेवाभावी उपक्रम राबवित आहे. आहे. प्रत्येक मुलगा शाळेत गेला पाहिजे आणि तो शाळेत टिकला पाहिजे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी यावर्षी मानोरा येथे सत्तर विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्यासोबत संस्था काम करत आहे. याचाच एक भाग म्हणून यावर्षी मानोरा येथे ७० मुलांना २४ सप्टेंबर २०२१ रोजी वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे वसंतराव नाईक विद्यालयाचे मुखाध्यापक प्रसेनजित भगत आणि प्रकल्प अधिकारी रामहरी इरकर हे उपस्थित होते. कोरोना आजार लक्षात घेऊन मास्क, सॅनिटायजर आणि दोन व्यक्तींतील अंतर या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. विद्यार्थी व पालक यांनी डॉ. विली मॅडम यांचे आभार मानले. यासाठी समाधान ठाकरे, भारत डेरे, स्वाती पंडितकर या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.

Web Title: Distribution of free educational materials to 70 children of Manora