शिक्षकांचे वेतन अनुदान तत्काळ वितरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:50 IST2021-09-08T04:50:01+5:302021-09-08T04:50:01+5:30
यासंदर्भात मंगळवारी सरनाईक यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यात नमूद करण्यात आले आहे की, मागील कित्येक ...

शिक्षकांचे वेतन अनुदान तत्काळ वितरित करा
यासंदर्भात मंगळवारी सरनाईक यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यात नमूद करण्यात आले आहे की, मागील कित्येक महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाकडून वेळेवर व पुरेसा निधी वितरित होणे कठीण झाले आहे. कधीकधी निधी उपलब्ध होऊनही शाहीच्या प्रतिअभावी वेतन होत नाही. तसेच वेतन पथक कार्यालयाकडून दिरंगाई झाल्यामुळे देखील हा प्रश्न गंभीर झाला आहे.
बहुतांश शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विविध प्रकारची कर्ज असल्यामुळे, विमा हप्ते असल्यामुळे त्यांना विनाकारणचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन शिक्षकांचे वेतन अनुदान तत्काळ वितरित करण्यात यावे व हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात यावा, अशी मागणी ॲड. सरनाईक यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.