शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

वाशिम जिल्हयातील शंभरावर जि.प. शाळांचा वीजपुरवठा खंडित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 13:52 IST

जिल्हयातील शंभरावर शाळांचा वीजपुरवठा खंडीत असल्याने ई-लर्निंग उपक्रमही प्रभावित झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद शाळांच्या विद्युत देयकाचा भरणा कोणत्या निधीतून करावा, याबाबत अद्याप कुठलीही तरतूद नसल्याने मुख्याध्यापक अडचणीत सापडले आहेत. विद्युत देयकांचा भरणा थकीत असल्याने जिल्हयातील शंभरावर शाळांचा वीजपुरवठा खंडीत असल्याने ई-लर्निंग उपक्रमही प्रभावित झाला.खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील दर्जा उच्च प्रतीचा नसतो, अशी ओरड नेहमीच होते. याला जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा अपवाद ठरत आहेत. पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध नसतानाही, विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षक व मुख्याध्यापक नानाविध प्रयोग राबवित आहेत. समग्र शिक्षा अभियान तसेच अन्य योजनांतून जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतू, शासनस्तरावरून पुरेशा प्रमाणात निधी प्राप्त होत असल्याने प्रत्येक शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध होउ शकत नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी, ई-लर्निंग उपक्रम राबविण्यासाठी समग्र शिक्षा अभियान तसेच मुख्याध्यापक, शिक्षकांनी गावकऱ्यांमधून लोकवर्गणी केली. यामुळे जिल्ह्यात ७०० पेक्षा अधिक शाळांना डिजिटलची जोड मिळाली. परंतू, विद्युत देयकाचा भरणा करण्यासाठी निधीची तरतूद नसल्याने मुख्याध्यापक, शिक्षकांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक शाळांचे वीज देयक थकीत असल्याने ई-लर्निंग उपक्रमही प्रभावित झाला. दोन दिवसांपूर्वी वाशिम तालुक्यातील मोहगव्हान आणि अन्य एका जि.प. शाळेचे वीज देयक थकीत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे विद्यार्थांचे नुकसान होत आहे, विजेअभावी शाळेतील संगणक व टीव्ही बंद झाला आहे. विजेचे देयक कुणी भरावे याबाबत स्पष्टता नसल्याने मुख्याध्यापक अडचणीत आहेत.

विद्युत देयकाचा भरणा करण्यासंदर्भात सूचनाग्राम पंचायतींला दरवर्षी १४ व्या वित्त आयोगातून लाखो रुपयांचा निधी शासनाकडून दिला जातो. या निधीमधून जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलभूत सुविधा उपलब्ध कराव्या, विद्युत देयकाचा भरणा करावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिल्या होत्या. या सुचनांची अंमलबजावणी काही ग्रामपंचायतींनी केली तर अनेक ग्राम पंचायती शाळांच्या विद्युत देयकाचा भरणा करण्याकडे सोयीस्कर बगल देत आहेत. बहुतांश शाळांचे विद्युत देयक भरण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकच पुढाकार घेत आहेत. विद्युत देयकासाठी निधीची तरतूद करावी, असा सूर शिक्षक, मुख्याध्यापकांमधून उमटत आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा