उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
By Admin | Updated: September 8, 2015 02:11 IST2015-09-08T02:11:22+5:302015-09-08T02:11:22+5:30
मालेगावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी तिस-या दिवशी उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांंची प्रकृती खालावली.

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
मालेगाव (जि. वाशिम) : मालेगाव शहरातील आठवडी बाजारात चालणारे अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी नितीन कांबळे व शेख अमजद ५ सप्टेंबरपासून मालेगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. तिसर्या दिवशीही उपोषण सुरू राहिल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. मालेगाव येथील आठवडी बाजारात अवैध धंद्यांसोबतच वारांगणांनी ठाण मांडल्याने या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वारांगणांचा व्यवसाय आणि अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी दोन युवकांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. अद्याप या उपोषणाची दखल संबंधितांनी घेतली नसल्याने ७ सप्टेंबरलाही उपोषण सुरू होते. दरम्यान, ठोस आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा मानस उपोषणकर्त्यांंनी व्यक्त केला.