ईडीच्या चाैकशी अहवालाबाबत जिल्ह्यात रंगताहेत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST2021-09-10T04:49:31+5:302021-09-10T04:49:31+5:30
वाशिम : जिल्ह्यात अनेक घाेटाळे, भ्रष्टाचार झालेत; परंतु आजपर्यंत कधी वरिष्ठ स्तरावर चाैकशी झाली नाही. गत महिन्यापासून दाेन वेळ ...

ईडीच्या चाैकशी अहवालाबाबत जिल्ह्यात रंगताहेत चर्चा
वाशिम : जिल्ह्यात अनेक घाेटाळे, भ्रष्टाचार झालेत; परंतु आजपर्यंत कधी वरिष्ठ स्तरावर चाैकशी झाली नाही. गत महिन्यापासून दाेन वेळ ईडीचे अधिकारी जिल्ह्यात येऊन गेल्याने त्यांनी केलेल्या चाैकशीत काय आढळते, याबाबत जिल्ह्यात सर्वत्र चर्चा रंगताहेत. या चर्चांना विराेधी पक्ष चांगलेच खतपाणी घालताना दिसून येत आहेत.
वाशिम जिल्ह्यातील कर्तव्यतत्पर, विकास कार्य खेचून आणणाऱ्या दाेन लाेकप्रतिनिधींनी माेठ्या प्रमाणात घाेटाळा केल्याचा आराेप - प्रत्याराेप केला जात आहे. यामध्ये खासदार भावना गवळी यांनी आपल्या संस्थांमध्ये १०० काेटी रुपयांचा, तर आमदार पाटणी यांच्या कुटुंबीयांनी जमीन खरेदी - विक्री व्यवहारात ५०० काेटी रुपयांचा घाेटाळा केल्याचे म्हटले जात आहे. खा. भावना गवळी यांनी १०० काेटींचा घाेटाळा केल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट साेमय्या यांनी संबंधितांकडे केली. त्यानुसार त्यांची ईडीकडून चाैकशी केली जात आहे. या चाैकशीबाबत शिवसैनिकांकडून निषेध नाेंदवून शिवसेना नेत्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सर्वत्र हाेत असल्याचे म्हटले आहे. शिवसेना नेत्यांचीच चाैकशी का? भाजपच्या लाेकप्रतिनिधींवरही घाेटाळ्यांचे आराेप हाेत आहेत. त्यांची चाैकशी का केली जात नाही, असा प्रश्न शिवसैनिकांकडून केला जात आहे. जिल्ह्यात ईडीचे अधिकारी आल्याने सर्वत्र खळबळ उडाल्याने सर्वत्र याच घटनेबाबत चर्चा हाेत असून, पुढे काय हाेणार, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. यामध्ये दाेषींवर कारवाई निश्चित हाेईल, असा आत्मविश्वास भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे, तर शिवसैनिक ‘कर नही ताे डर काय का’ म्हणत आहेत. ईडीचा चाैकशी अहवाल जाे येईल ताे येईल; परंतु जिल्ह्यामध्ये सणासुदीच्या काळातही जागाेजागी याचीच चर्चा हाेताना दिसून येत आहे, एवढे मात्र नक्की.
....
किरीट साेमय्या यांना सुरक्षा
ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आराेप करुन त्यांचा घाेटाळा उघडकीस आणण्याचे काम भाजप नेते किरीट साेमय्या करीत असल्याने त्यांना धमक्या येत असून, सुरक्षेची मागणी केली हाेती. त्यांच्या मागणीला केंद्र सरकारने त्यांना झेड दर्जाची सुरक्षा दिली आहे. देगाव येथे त्यांच्या वाहनावर शाई व दगडफेक झाली हाेती. केंद्र सरकारने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ४० जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. यामुळे अनेक प्रकरणे अधिक उजेडात येणार असल्याची चर्चा हाेत आहे.