पर्यटन विकास आराखड्यावर चर्चा
By Admin | Updated: January 22, 2016 01:50 IST2016-01-22T01:50:03+5:302016-01-22T01:50:03+5:30
तीर्थक्षेत्र लोणीसाठी सुमारे १८ कोटींची तरतूद; तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास.

पर्यटन विकास आराखड्यावर चर्चा
रिसोड : तालुक्यातील ङ्म्रीक्षेत्र लोणीच्या सर्वांंगीण विकासासाठी पर्यटन विकास आराखड्यातून जवळपास १८ कोटी रुपयांच्या विकासात्मक कामांची तरतूद केली जात आहे. गुरुवारी लोकप्रतिनिधी व अधिकार्यांनी ङ्म्रीक्षेत्र लोणीची पाहणी करून आराखड्यावर चर्चा केली. आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, तहसीलदार अमोल कुंभार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. अंतर्गत रस्ते, सभामंडप बांधकाम, लोणार फाटा ते ङ्म्री सखाराम महाराज मंदिरापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करणे, संस्थानजवळ भक्तांच्या सोयीसाठी वाहन तळाची व्यवस्था करणे, आठवडी बाजार, महापंगत व रथ प्रदक्षिणा मार्गावर व वाहनतळाच्या ठिकाणी सौर उर्जेवरील पथदिव्यांची व्यवस्था करणे, सभागृहाची व स्वच्छतागृहाची दुरुस्ती करणे, ङ्म्रीक्षेत्र लोणी भारनियमनमुक्त करणे, स्वतंत्र गावठाण फिडर मंजूर करणे आदी ठराव ग्रामपंचायतने मंजूर केलेले आहेत. या ठरावाच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून पर्यटन विकास आराखड्यातून कामे प्रस्तावित केली जाणार आहेत. यासाठी जवळपास १८ कोटींच्या आसपास निधीची मागणी केली जाईल. आमदार झनक व अधिकार्यांनी लोणीला भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. पर्यटन विकास निधीतून ङ्म्री संत सखाराम महाराज संस्थानचा सर्वांंगीण विकास साधला जाईल, विकासात्मक कामे दज्रेदार केली जातील, सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या जातील, भाविकांसाठी सोयी-सुविधांची व्यवस्था होईल, अशी ग्वाही आमदार अमित झनक व अधिकार्यांनी यावेळी गावकर्यांना दिली.