जिल्ह्यात लाेकप्रतिनिधींवरील काेट्यवधी घाेटाळ्यांचीच चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:43 IST2021-08-22T04:43:32+5:302021-08-22T04:43:32+5:30
नंदकिशोर नारे वाशिम : जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींनी घाेटाळा केला, असा आराेप आजवर झाला नसल्याने अचानक चक्क दाेन लाेकप्रतिनिधींवर काेट्यवधी रुपयांच्या ...

जिल्ह्यात लाेकप्रतिनिधींवरील काेट्यवधी घाेटाळ्यांचीच चर्चा
नंदकिशोर नारे
वाशिम : जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींनी घाेटाळा केला, असा आराेप आजवर झाला नसल्याने अचानक चक्क दाेन लाेकप्रतिनिधींवर काेट्यवधी रुपयांच्या घाेटाळ्याच्या आराेपाने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील विकासकामे, समस्यांसह इतर विषयांकडे दुर्लक्ष झाले असून, संपूर्ण जिल्ह्यात केवळ लाेकप्रतिनिधींच्या घाेटाळ्याच्याच चर्चा रंगत आहेत.
आमदार राजेंद्र पाटणी यांनी खाेटे दस्तावेज जमा करून जमिनी बळकावल्यात. यात ५०० काेटींचा घाेटाळा केल्याचा आराेप खासदार भावना गवळी यांनी, तर खा. भावना गवळी यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकीर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा आराेप भाजपा नेते किरीट साेमय्या यांनी केला. या आराेपांनी संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली; परंतु दाेन्ही नेत्यांचे समर्थक आपल्या नेत्यांची बाजू मांडताना हे एक आमच्या नेत्याबाबत षड्यंत्र असल्याचे बाेलत आहेत; परंतु सर्वसामान्य जनतेला मात्र काय घडत आहे, हे कळेनासे झाले आहे.
.........................
लाेकप्रतिनिधींवर प्रथमच घाेटाळ्याचे आराेप; पदाधिकारी, कार्यकर्ते बुचकळ्यात
जिल्ह्यात असलेल्या एक खासदार व तीन आमदारांपैकी प्रथमच एका आमदारावर व खासदारावर काेट्यवधी रुपयांचा घाेटाळा झाल्याचा आराेप झाला आहे. यापूर्वी असा जाहीर आराेप काेणीही केला नाही. यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच बुचकळ्यात अडकले असून, विविध चर्चा रंगत आहेत. असे असले तरी आमदार, खासदार यांचे समर्थक करण्यात आलेले आराेप कसे चुकीचे आहेत हे सांगताना दिसून येत आहेत. या प्रकारामुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापलेले दिसून येत आहे.
....................
अनेक वर्षांपूर्वीच्या घाेटाळ्यांच्या मुद्यांवर आता का चर्चा?
जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींवर झालेल्या घाेटाळ्याचे आराेप हे काही वर्षांपूर्वीचे तर काही वर्षांपासून सुरू असल्याचे दिसून येत आहेत. तेव्हा या प्रकारावर काेणीही न बाेलता नेमक्या अनेक वर्षांपूर्वीच्या या घाेटाळ्याची चर्चा आता का? याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चर्चा रंगत आहेत.