मेडशी जंक्शनबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST2021-08-01T04:37:39+5:302021-08-01T04:37:39+5:30
यावेळी जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेच्या कार्यकारी अभियंता यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून अडचणी दूर करण्याच्या सूचना केल्या, तसेच मेडशीमध्ये कोविड ...

मेडशी जंक्शनबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
यावेळी जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेच्या कार्यकारी अभियंता यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून अडचणी दूर करण्याच्या सूचना केल्या, तसेच मेडशीमध्ये कोविड लसीकरनाचे काम बघता पुढील लसीकरण वेळेस स्वतः हजर राहणार असल्याचे सरपंच यांना सांगितले. अकोला - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर मेडशीजवळ या महामार्गाचे बायपास देण्यात आले आहे. या बायपासवर एमडीआरमध्ये असलेला वाकलवाडी या रस्त्याला अंडरपास दिला नाही. यामुळे हेमाडपंती मंदिर असलेले महादेवाच्या दर्शनाकरिता जाणाऱ्या भाविकांना त्रासास सामाेरे जावे लागणार आहे.
त्याकरिता अंडरपास देण्यात यावे, तसेच मेडशीमध्ये अकोलाकडून येण्याकरिता व वाशिमकडून येण्याकरिता जंक्शनकरिता जागा अधिग्रहित करून सध्या सुरू असलेल्या वळण रस्त्यालाच जंक्शनचे काम सुरू करण्यात यावे, याबाबत जिल्हाधिकारी यांना भेटून सरपंच शेख जमीर शेख गनीभाई यांनी समस्या मांडल्या.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल विजय तायडे, रमजान गवरे, जगदीश राठोड, मूलचंद चव्हाण, उमेश तायडे, उपसरपंच धीरज मंत्री, ज्ञानेश्वर मुंडे, प्रसाद पाठक आदींची उपस्थिती होती.