दुभाजक झाले कचराकुंडी

By Admin | Updated: July 6, 2014 23:25 IST2014-07-06T23:19:46+5:302014-07-06T23:25:34+5:30

उभारलेल्या दुभाजकांची सध्या अतिशय दुरवस्था झाली असून, नागरिक दुभाजकांचा वापर चक्क ‘कचराकुंडी’ म्हणून करीत असल्याचे दिसून येत आहे.

Disconnected trash | दुभाजक झाले कचराकुंडी

दुभाजक झाले कचराकुंडी

कारंजा : वाहनांची आवागमन सूकर व्हावी आणि रस्त्याच्या सौंदर्यीकरणात भर पडावी, या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेल्या दुभाजकांची सध्या अतिशय दुरवस्था झाली असून, नागरिक दुभाजकांचा वापर चक्क ह्यकचराकुंडीह्ण म्हणून करीत असल्याचे दिसून येत आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येणार्‍या कारंजा ते मानोरा या रस्त्यावरील दुभाजकात प्लास्टिक पन्नी, सुकलेल्या फुलांचे हार, बिसलेरीच्या खाली बॉटल्स, देशी-विदेशी दारूच्या बॉटल्सचे बॉक्स आढळून येतात. याशिवाय हे दुभाजक ठिकठिकाणी फुटलेले आहेत. दुभाजकात वृक्ष लागवड करण्यात आली नाही. त्यामुळे त्यामध्ये गाजर गवत तथा इतर वनस्पती दिसून येतात. किमान २0 ते २५ फुटापर्यंत रूंदी असलेल्या या रस्त्यावरील दुभाजकानेच मोठी जागा घेतल्याचे लक्षात येते. त्यामुळे अपघाताची शक्यताही बळावली आहे. याशिवाय कारंजा ते दारव्हा मार्गावरील विश्रामगृहाजवळचा ह्यदुभाजकह्ण तर वाहनधारकांसाठी कर्दनकाळच ठरला आहे. या दुभाजकावर वाहन धडकून आजवर पाच ते सात अपघात घडले आहे. या मार्गावर मोठय़ा प्रमाणात जड वाहतूक होत असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे मोटारसायकलस्वार विश्रामगृहाजवळील दुभाजकांना जावून धडकले आहे. अपघातात काहींवर अपंगत्व ओढावले आहे. या दुभाजकाजवळील १0 ते १५ फुटामधील केवळ तीन ते साडे तीन फुटाचाच रस्ता व्यवस्थित आहे इतरत्र खड्डयांची वर्दळ आहे. त्यामुळे वाहनधारक सुस्थितीतील रस्त्यावरून आपले वाहन काढण्याचा प्रयत्न करतात. परिणामी अनेक लहान मोठय़ा वाहनांना अपघातासारख्या घटनांना तोंड द्यावे लागले आहे. मध्यंतरी याच रस्त्यावरून मार्ग काढणारा जड वाहतूकीचा एक ट्रक चक्क दुभाजकावर चढला होता. त्यामुळे ट्रकचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते, हे विशेष. तसेच या रस्त्याच्या दुभाजकावरील स्टाईलही उखळत चालली असून, ठिकठिकाणी दुभाजकाचा मोठा भागही खचला आहे. पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुभाजकावर रात्रीच्या वेळी वाहनधारकांना दिसून पडणारे फलक लावले नव्हते. त्यामुळे अपघातात वाढ झाली होती. मात्र सध्या या विभागाने रेडियम फलक लावल्याने रात्रीच्या अपघातात घट झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणार्‍या स्थानिक जयस्तंभ चौकापासून सिंधी कॅम्पकडे जाणार्‍या रस्त्यावरील दुभाजकांचीही दुरवस्था झाली आहे. दुभाजकात वृक्षलागवड लावण्यात न आल्याने रस्त्याचे सौंदर्य हरविले आहे. दरम्यान, जैनांची काशी म्हणून कारंजा शहराची दूरवर ख्याती आहे. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे ख्यातीप्राप्त मंदिरही येथे आहे.या मंदिरात दूरवरच्या भाविकांची मांदियाळी राहते. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष दिसून येते. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने या दुभाजकांची दुरूस्ती करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकातून होत आहे.

Web Title: Disconnected trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.