आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज !
By Admin | Updated: June 23, 2017 16:08 IST2017-06-23T16:08:39+5:302017-06-23T16:08:39+5:30
संभाव्य आपत्तीशी सामना करण्यासाठी वाशिम नगर परिषदेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला.

आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज !
वाशिम : संभाव्य आपत्तीशी सामना करण्यासाठी वाशिम नगर परिषदेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला. आपत्तकालिन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी वाशिम नगर परिषदेच्या अग्निशमन विभागात सुसज्ज असा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. या कक्षाचे रितसर उद्घाटन नगराध्यक्ष अशोक हेडा, मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. अग्निशमन विभागातील अधिकारी विवेक माकोडे, अनुजकुमार रामअवतार बाथम, कर्मचारी दिनकर सुरोशे, विजय कुलकर्णी तसेच फायर फायटर विजय काळे, विजय वानखेडे, गजु सुर्वे, ओम अर्धापूरकर, गोपाल अहिर, प्रशांत विभूते, प्रशांत पाटणकर, व्यंकटेश राजुलवार, संतोष आळणे, कल्पक डोळस, गणेश शिंदे, शैलेंद्र चंदेल आदींची उपस्थिती होती.