आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे गरीब रुग्णांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:38 IST2021-08-01T04:38:14+5:302021-08-01T04:38:14+5:30
तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारक-परिचारिका, रुग्णवाहिकाचालक अशी अनेक पदे रिक्त आहेत. त्याशिवाय रुग्णवाहिकाही नादुरुस्त असून, ...

आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे गरीब रुग्णांची गैरसोय
तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारक-परिचारिका, रुग्णवाहिकाचालक अशी अनेक पदे रिक्त आहेत. त्याशिवाय रुग्णवाहिकाही नादुरुस्त असून, शेंदुरजना आढाव येथील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्यामुळे एका तरुणीला जीव गमवावा लागला. त्याचबरोबर रुई येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत गेल्या तीन वर्षांपासून धूळ खात पडली असून, ही इमारत जनसेवेत त्वरित रुजू करावी, तालुक्यातील डॉक्टरांना दिलेला इतर ठिकाणचा अतिरिक्त पदभार रद्द करून त्यांना ताबडतोब मुख्यालय रुजू करण्यात यावे, अशा विविध मागण्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आल्या आहेत.
---------.
...तर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
तालुक्याअंतर्गत आरोग्य विभागांतील विविध समस्या सोडविण्याबाबत केलेल्या मागणीची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याची तयारी प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे. याबाबत आरोग्य विभागाला निवेदनही देण्यात आले आहे. प्रा. ओम बलोदे व राम ढाकुलकर, तालुकाअध्यक्ष श्याम पवार, शहर अध्यक्ष गोलू वाळले यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.