पांदण रस्त्याअभावी शेतकºयांची गैरसोय !
By Admin | Updated: June 26, 2017 13:10 IST2017-06-26T13:10:03+5:302017-06-26T13:10:03+5:30
पांदण रस्त्याचे काम करण्यात न आल्याने शेतकºयांना पावसाळयात मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पांदण रस्त्याअभावी शेतकºयांची गैरसोय !
कारपा : येथून जवळच असलेल्या देवठाणा येथे एकही पांदण रस्त्याचे काम करण्यात न आल्याने शेतकऱ्यांना पावसाळयात मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
परिसरातील देवठाणा, सोमठाणा, धोत्रा व इतर भागाकडील शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याकडे पांदण रस्ते झाले नाहीत. कच्चे रस्ते असल्याने पाऊस आला की चिखल होतो. त्यामुळे एक ते दोन फुट चिखलातून शेतकऱ्यांना वाटचाल करावी लागते. येथील पांदण रस्ते करणे गरजेचे झाले आहे. पांदण रस्ते करण्याची मागणी यापूर्वी अनेकवेळा करण्यात आली. मात्र, अद्यापही याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. ग्रामपंचायत व तालुका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी शामराव राउत यांच्यासह शेतकऱ्यांनी केली.