अपंग कवितेचा अनिकेतही झाला अपंग

By Admin | Updated: September 25, 2015 01:23 IST2015-09-25T01:22:00+5:302015-09-25T01:23:43+5:30

अपघातात गमावला हात; मातेची मदतीची याचना.

Disabled Poetry | अपंग कवितेचा अनिकेतही झाला अपंग

अपंग कवितेचा अनिकेतही झाला अपंग

धनंजय कपाले / वाशिम : मुळात अंपग, आणि त्यात गरीबीचा अभिशाप भोगत असलेल्या सिव्हिल लाईन येथील कविता पुर्णये यांच्यावर बुधवारी संकटांचा पहाड कोसळला. ट्रॅक्टरने सायकलला धडक दिल्याने तिच्या नऊ वर्षीय अनिकेतचा अपघात झाला असून, त्याचा एक हात शरीरापासून वेगळा करावा लागला. अनिकेतच्या उपचारासाठी कविता आता दारोदारी फिरत असून, मदतीची याचना करीत आहे. मदत करणार्‍या देवदूताची ती आतुरतेने वाट पाहत आहे. जिच्या यातनाचे जगी मोल नाही । तिच्यासारखा लाघवी बोल नाही।। २३ सप्टेंबरची पहाट उगवली. नित्यनियमाप्रमाणे अपंग असलेली आई पहाटे पाच वाजता उठून आपल्या चिमुकल्या अनिकेतला शाळेत पाठविण्यासाठी तयारीला लागली. तीने आपल्या चिमुकल्याला त्याच्या आवडीनुसार ह्यटिफीनह्ण तयार करून दिला. त्याचे बुट, त्याची सायकल आपल्या हाताने पुसून त्याला शाळेत पाठविले. दररोज प्रमाणे दुपारी १२:३0 वाजेपर्यंत घरी परतणारा आपला चिमुकला अद्याप कसा परतला नाही म्हणून तिची नजर सारखी आपल्या घराकडे येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याकडे होती. तिला आपला चिमुकला अनिकेत कुठेच दिसत नव्हता. थोड्या वेळातच तिच्याकडे निरोप आला, अनिकेतचा अपघात झाला असून, तो एका हाताने अपंग झाला. ही वार्ता कळताच अनिकेतची अपंग आई धाय मोकलून हंबरडा फोडायला लागली. मन सुन्न करणार्‍या या घटनेने सिव्हिल लाईन परिसरात स्मशान शांतता पसरली होती. आपल्या चिमुकल्यावर उपचार करण्यासाठी तिने अकोल्याच्या खासगी रूग्णालयात धाव घेतली; परंतु डॉक्टरांनी कविताची समजूत काढून अपघातग्रस्त अनिकेतचा डावा हात कायमचाच काढावा लागणार, असे सांगून उपचारासाठी लागणारा खर्च त्वरित जमा करा, अशा सूचना दिल्या. आधिच अठरा विश्‍व दारिद्र्यात अडकलेल्या कवितेला उपचारासाठी कुठून पैसे आणावे, हे कळेनासे झाले. शेजारील लोकांनी लोकवर्गणी जमा करून जेमतेम ६0 हजार रूपयाची व्यवस्था करून कविताला मदत केली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अनिकेतवर उपचार करण्यासाठी आणखी दोन ते अडीच लाख रूपये एवढा खर्च अपेक्षित आहे. अपंग कवितेचा पती प्रवीण पुर्णये हा वाहन चालक म्हणून रोजंदारीवर काम करतो. अपंग कविता घरकाम करून कापड शिलाई करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अपंग कविताला मदत करण्यासाठी कुणी देवदूत मिळेल काय ?

Web Title: Disabled Poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.