विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST2021-08-14T04:47:20+5:302021-08-14T04:47:20+5:30
यासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासकीय निर्देशानुसार दिव्यांगाना पाच टक्के निधी वाटप करण्याच्या स्पष्ट सूचना आहेत ; ...

विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचे धरणे आंदोलन
यासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासकीय निर्देशानुसार दिव्यांगाना पाच टक्के निधी वाटप करण्याच्या स्पष्ट सूचना आहेत ; परंतु अरक, चिचांळा, कंझरा, गणेशपूर, घोटा, चकवा, शिवणी ग्रामपंचायतीने अद्याप दिव्यांगांना निधीचे वाटप केलेले नाही. दिव्यांगांसाठी असलेल्या इतरही योजनांची अंमलबजावणी ठप्प असून सरपंच, ग्रामसेवकाने याबाबत उदासीन धोरण अवलंबिले आहे.
तथापि, ग्रामपंचायत क्षेत्रात दिव्यांगाना विनाअट घरकूल देण्यात यावे, त्यांना घरपट्टीत ५० टक्के सवलत द्यावी, ७ वर्षांचा पाच टक्के याप्रमाणे निधी वाटप तत्काळ करावा, गावातील दिव्यांगांची प्रत्यक्ष नोंदणी करून तशी यादी पंचायत समितीला सादर करावी, दिव्यांगांना व्यवसायासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. धरणे आंदोलनात संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष लताताई गावंडे, उपाध्यक्ष आकाश गावंडे, गुणवंता आखरे, गजानन पिंगाने, केशव वावगे, सचिन कावरे, विष्णू गावंडे, शंकर कावरे, गजानन हरणे, विष्णू कावरे, शिल्पा हिवराळे, गजानन कातडे आदींनी सहभाग नोंदविला.