पहिल्याच पावसाने रस्त्यावर घाणपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:51 IST2021-06-09T04:51:26+5:302021-06-09T04:51:26+5:30

पावसाळापूर्व साफसफाईकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष मानोरा- शहर आणि तालुक्यामध्ये ७ जून राेजी झालेल्या पावसाने मानोरा शहरातील बहुतांश वॉर्डांमधील साफसफाई ...

Dirt on the road with the first rain | पहिल्याच पावसाने रस्त्यावर घाणपाणी

पहिल्याच पावसाने रस्त्यावर घाणपाणी

पावसाळापूर्व साफसफाईकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष

मानोरा- शहर आणि तालुक्यामध्ये ७ जून राेजी झालेल्या पावसाने मानोरा शहरातील बहुतांश वॉर्डांमधील साफसफाई न केल्यामुळे तुंबलेल्या नाल्यातील घाण रस्त्यावर आल्याने प्रचंड घाणीचा सामना शहरवासीयांना करावा लागला.

एकीकडे तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर झालेल्या पावसामुळे हसू दिसत होते, तर दुसरीकडे न.पं.च्या अकार्यक्षमतेमुळे नागरिकांत राेष व्यक्त केला जात हाेता. मानोरा शहरात पहिल्याच पावसाने जागोजागी नाल्या, गटारी तुंबल्याने नगरपंचायतचे काम दिसून येत हाेते. मानोरा शहरवासी एकीकडे मागील एक वर्षापासून कोरोना महामारीचा मोठ्या धैर्याने आणि शासकीय नियम व अटींचे पालन करून सामना करीत असताना मात्र न.पं. प्रशासन स्वच्छताविषयक बाबींकडे दुर्लक्ष करून शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात घालीत असल्याच्या भावना यावेळी संतप्त नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. पहिल्याच पावसात शहरातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असताना पुढे येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांचे काय हाल होतील यासंबंधी आतापासूनच नागरिक तर्कवितर्क लढवीत आहेत.

Web Title: Dirt on the road with the first rain