नाल्यांचे पाणी साचल्याने घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST2021-06-04T04:31:44+5:302021-06-04T04:31:44+5:30
त्यामुळे राेगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही .शिवाय सध्या कोविड महामारीची साथ सुरू असल्याने कॉलनीत चिंतेचे वातावरण निर्माण ...

नाल्यांचे पाणी साचल्याने घाणीचे साम्राज्य
त्यामुळे राेगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही .शिवाय सध्या कोविड महामारीची साथ सुरू असल्याने कॉलनीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे
सहारा कॉलनीत श्रीकांत जाधव यांच्या घरापासून ते सहारा गेटपर्यंत हजार फूट लांबीची मुख्य नाली आहे . नालीला कॉलनीतील इतर नाल्यांचे पाणी येऊन मिळते ,मात्र हे मुख्य नाली सहारा गेटजवळ बुजविले गेल्याने नालीतील सांडपाणी समोर जात नाही. त्यामुळे ते रस्त्यावर वाहत आहे . यामुळे नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागतो.
यासंदर्भात नगरपालिकेला दोनदा निवेदन दिले आहे आणि वारंवार पाठपुरावा केलेला आहे , तरीही नगरपरिषदेने अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही .तेव्हा या नालीतील सांडपाण्याचा प्रवाह योग्य दिशेने वळवून लोकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी कॉलनीतील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे केलेली आहे.