सरकारी शाळांमध्येही डिजिटल क्लासरूम

By Admin | Updated: January 23, 2016 02:03 IST2016-01-23T02:03:02+5:302016-01-23T02:03:02+5:30

जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला पुढाकार.

Digital classroom in government schools | सरकारी शाळांमध्येही डिजिटल क्लासरूम

सरकारी शाळांमध्येही डिजिटल क्लासरूम

साहेबराव राठोड/ मंगरुळपीर ( जि. वाशिम ): खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांमधील शैक्षणिक दर्जा घसरल्याचा समज खोडून काढण्यासाठी जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. याला पालकांच्या लोकवर्गणीची साथ मिळत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही डिजिटल क्लासरूम साकारणार आहेत. या प्रयत्नांचा पहिला भाग म्हणून मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्लासरूम आकारास आली. खासगी शाळांचे पीक भरमसाठ जोमात आल्याने गोरगरीब पालकांना न. प. व जि.प.च्या शाळांशिवाय पर्याय उरला नाही. सरकारी शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी जिल्हा परिषद व रिसोड नगर परिषद प्रशासन सरसावले असून, आता डिजिटल क्लासरूमची संकल्पना साकारली जाणार आहे. डिजिटल वर्गखोलीद्वारे विद्यार्थ्यांंना तंत्रज्ञानाशी जोडले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ३0 ते ४0 शाळांमध्ये डिजिटल क्लासरूमची संकल्पना साकारली जाणार आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी जिल्हा परिषद शाळेत लोकवर्गणीतून डिजिटल क्लासरूम साकारली आहे. मुख्याध्यापिका छाया कदम, पदवीधर शिक्षक शरद सुरसे यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत डिजिटल क्लासरूमबाबत चर्चा केली. शिक्षणाधिकारी व शिक्षण सभापतींच्या मार्गदर्शनात या उपक्रमाची लोकवर्गणीतून अंमलबजावणी केली.

Web Title: Digital classroom in government schools