पिंप्री मोडक येथे डायरियाचा प्रकोप
By Admin | Updated: November 29, 2014 23:42 IST2014-11-29T23:42:22+5:302014-11-29T23:42:22+5:30
२५0 रूग्णांना लागण : पाईपलाईनमध्ये दुषित पाण्याचा निचरा.
_ns.jpg)
पिंप्री मोडक येथे डायरियाचा प्रकोप
कामरगाव (वाशिम) : दुषित पाणी प्याल्याने पिंप्री मोडक येथील ग्रामस्थांना डायरियाची लागण झाली असून, गावातील तब्बल २५0 च्यावर रूग्ण येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत.
पिंप्री मोडक येथील ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. परंतु मागील अनेक दिवसापासून पाईपलाईन चार ठिकाणी फुटली आहे. परिणामी ग्रामस्थांना दुषित पाणी मिळत आहे. हे पाणी प्याल्याने गावात डायरियाची लागण झाली आहे. दरम्यान, मागील तीन दिवसापासून गावात डायरियाची लागण झाली असताना धनजचा आरोग्य विभाग मात्र अजुनही झोपेतच आहे. दररोज डायरियाची रूग्ण वाढत असल्याने कामरगाव येथील ग्रामीण रूग्णालय रूग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. बाह्य रूग्ण विभागात दररोज ५0 रूग्णांना औषध वाटप करण्यात येते तर २0 पेक्षा जास्त रूग्णांना भरती करण्यात येत आहे. सध्या एका खाटेवर दोन-दोन रूग्णांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, कारंजा पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद लळे, जि.प.सदस्य चव्हाण, पंचायत समिती सदस्य मधुकर हिरडे यांनी ग्रामीण रूग्णालयाला भेट देऊन रूग्णांची पाहणी केली.