ढोरखेडा येथे महिलांनी हटविले अतिक्रमण!

By Admin | Updated: March 3, 2017 01:11 IST2017-03-03T01:11:03+5:302017-03-03T01:11:03+5:30

महिला सरपंचांचा पुढाकार : पोलीस बंदोबस्ताविना काढले अतिक्रमण

At Dhorkheda, women removed encroachment! | ढोरखेडा येथे महिलांनी हटविले अतिक्रमण!

ढोरखेडा येथे महिलांनी हटविले अतिक्रमण!

शिरपूर जैन, दि.२ : येथून जवळच असलेल्या ढोरखेडा येथे महिला सरपंच सुनिता मिटकरी यांनी गावातील महिलांच्या सहकार्यातून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी पोलीस बंदोबस्ताविना अतिक्रमण काढण्यात आले.
ग्राम ढोरखेडा येथे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात फोफावले होते. या अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. ढोरखेडा गावात अतिक्रमण झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला होता. या पृष्ठभूमीवर सरपंच सुनिता मिटकरी यांनी कन्याकुमारी ढवळे, जयश्री सावले, नंदाबाई गावंडे, अलका पवार, शशीकला ढवळे, वनिता सावळे, पार्वती सावळे आदी महिलांच्या सहकार्याने जेसीबी मशीनद्वारे गावातील अतिक्रमण हटावचा बुधवारी श्रीगणेशा केला. गावातील अतिक्रमण हटविण्यात आले.

 

Web Title: At Dhorkheda, women removed encroachment!