धनज बु. येथील दोन शिक्षक कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST2021-02-05T09:23:52+5:302021-02-05T09:23:52+5:30
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना संसर्गाची खबरदारी ...

धनज बु. येथील दोन शिक्षक कोरोनाबाधित
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना संसर्गाची खबरदारी घेऊन विविध उपाययोजनांसह शाळा सुरू करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत. यानुसार शिक्षकांची कोरोना चाचणी, शाळेचे निर्जंतुकीकरण आणि सॅनिटायझरचा वापर करून शाळा सुरू करण्याची तयारी कारंजा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने केली आहे. अशातच सोमवारी धनज बु. येथील एम. बी. हायस्कूल या शाळेतील एक शिक्षक आणि एक शिक्षिका कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. हे दोघेही अमरावती येथून ये-जा करतात. आता ते कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांतही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शाळा सुरू करणे जोखमीचे ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.