भक्तांचा सागर उसळला!
By Admin | Updated: March 2, 2016 02:45 IST2016-03-02T02:45:36+5:302016-03-02T02:45:36+5:30
प्रकटदिन सोहळा: ‘श्रीं’च्या चरणी लाखो भाविक नतमस्तक.

भक्तांचा सागर उसळला!
रिठद (जि. वाशिम): प्रतिशेगाव रिठदनगरीत १ मार्च रोजी ङ्म्री संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिनी परिसरातीलच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरील लाखो भाविकांनी महाराजांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
मंगळवारी पहाटे ५ वाजता ह्यङ्म्रींह्णच्या मूर्तीला वेदशास्त्रसंपन्न मधुरादास चौथाईवाले (राक्षसभुवन शनीचे) यांच्या आचार्यत्वाखाली होमहवन करण्यात आले. यानंतर अभिषेक व महाआरती करण्यात आली. ह्यङ्म्रींह्णच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. सकाळी ९ ते ११ या वेळेत वेदान्ताचार्य उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याचे कीर्तनानंतर लगेचच सिध्देश्वर संस्थानचे अध्यक्ष शांतीपुरी महाराज यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. रात्री उशिरापर्यंंंत भाविकांची महाप्रसाद घेण्यासाठी लगबग सुरु होती. येथील महाप्रसाद दिवसभर असल्यामुळे अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने या ठिकाणी भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळतो. ह्यङ्म्रींह्णचा प्रकटदिन उत्सव आता सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जात असतो. रिठद येथील ह्यङ्म्रींह्णचा प्रकटदिन सोहळा विशेष महत्त्वपूर्ण असतो. महोत्सवाला यावर्षी तब्बल १९ वर्षे पूर्ण झालीत. त्यामुळे वाशिम जिल्हयातील सर्वांंंत जुना व सर्वांंंत मोठा प्रकटदिन महोत्सव म्हणून येथील सोहळ्याकडे पाहिले जाते. आ. राजेंद्र पाटणी, आ. अमित झनक, आ. लखन मलिक, जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, सभापती सुभाष शिंदे, चक्रधर गोटे, जिल्हा नियोजन विकास समिती सदस्य स्वप्निल सरनाईक यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रांतील विविध मान्यवरांनी रिठद येथे दर्शन व महाप्रसादास हजेरी लावली.
यानिमित्त आयोजित भव्य यात्रा महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी दूरदुरून बरेच व्यापारी आपले दुकाने घेऊन यात्रोत्सवात सहभागी झाले होते. सायंकाळी ६ नंतर अचानक अवकाळी पाऊस व वादळी वार्याने हजेरी लावल्याने भाविक व यात्रेकरूंची एकच धावपळ उडाली. वादळी वार्यामुळे यात्रेत दुकाने थाटणार्या व्यावसायिकांचे नुकसान झाले.