वाशिम जिल्हय़ातील दोन तीर्थक्षेत्रांचा होणार विकास
By Admin | Updated: March 19, 2015 01:37 IST2015-03-19T01:37:12+5:302015-03-19T01:37:12+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये समाधी स्थळ व तीर्थक्षेत्र विकासासाठी तरतूद.

वाशिम जिल्हय़ातील दोन तीर्थक्षेत्रांचा होणार विकास
वाशिम : शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १८ मार्चला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समाधी स्थळ व तीर्थक्षेत्र विकासासाठी तरतूद केली आहे. समाधी स्थळांच्या विकासासाठी ३९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये बंजारा समाजाची काशी पोहरादेवीचाही समावेश असल्याने येथील मूलभूत सुविधांसाठी ६ ते ७ कोटी रुपये दिल्या जाणार आहेत. यामुळे बंजारा समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आमदार राजेंद्र पाटणी यांनी फेब्रुवारीमध्ये वित्तमंत्री व मुख्यमंत्री यांना पत्र देऊन या विषयाकडे लक्ष वेधले होते; तसेच राज्यातील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी १२५ कोटी रूपये देण्यात आले असून, त्यामध्ये वाशिम जिल्हय़ातील रिसोड तालुक्यामधील तीर्थक्षेत्र लोणीचा समावेश आहे. लोणी तीर्थक्षेत्राला साडेसात ते आठ कोटीच्या जवळपास रुपये दिल्या जाणार आहेत. याबाबत लोणी येथील कल्याण महाराज जोशी यांनी समाधान व्यक्त केले.