शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

लोकसहभागातून पाणवठे तयार करण्याचा निर्धार ; वन्यजीवप्रेमींचा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 14:24 IST

वाशिम: उन्हाळ्यांच्या दिवसांत पाण्यासाठी भटकंती करणाºया वन्यप्राण्यांचा जीव संकटात येऊ नये म्हणून वाशिम जिल्ह्यातील जंगलात मंगरुळपीर येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सदस्यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: उन्हाळ्यांच्या दिवसांत पाण्यासाठी भटकंती करणाºया वन्यप्राण्यांचा जीव संकटात येऊ नये म्हणून वाशिम जिल्ह्यातील जंगलात मंगरुळपीर येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सदस्यांनी केला आहे. या अंतर्गत जिल्हाभरातील जंगलात प्रत्येकी ७ हजार रुपये खर्चून शेकडो पाणवठे तयार केले जाणार आहेत.वाशिम जिल्ह्याचा बहुतांश भाग वनक्षेत्राने वेढला आहे. उष्णकटीबंधीय या भागांतील जंगलात पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. उन्हाळ्याची चाहुल लागताच या जंगलातील जलस्त्रोत कोरडे पडतात. त्यामुळे या जंगलातील विविध वनप्रजांतींच्या पशू, पक्ष्यांना पाण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घ्यावी लागते आणि त्यातून मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवतो. यामुळे वन्यप्राण्यांसह माणसाच्या जिवालाही धोका आहे. त्याशिवाय रस्त्यावर सैरावैरा धावताना वन्यप्राणी अपघाताला बळी पडत आहेत. गेल्या काही वर्षांत अशाच प्रकारांतून अनेक वन्यप्राण्यांचा जीवही गेला, तर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे अनेक लोेक गंभीर जखमी झाले आहेत. ही समस्या लक्षात घेऊन वाशिम जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांनी त्यांच्या वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमच्या सहकार्याने लोकसहभागातून जंगलात पाणवठे तयार करण्याचे ठरविले आहे. यासाठी त्यांनी उपवनसंरक्षक वाशिम यांना पत्र सादर करून लोकसहभागातून जंगलात पाणवठे तयार करण्यासाठी परवानगी मागितली आहे. विटा, सिमेंट, मजुरी, खडी आणि ग्रीन नेटसह इतर खर्च मिळून सात हजार रुपयांत एक पाणवठा या अभियानातून तयार होणार असून, असे शेकडो पाणवठे संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील जंगलात त्यांच्यावतीने तयार केले जाणार आहेत.  उपवनसंरक्षकांकडून निर्णयाचे समर्थनवाशिम जिल्ह्यातील जंगलात उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच जलसाठे आटतात, तर हतर पर्यायी व्यवस्थाही नाहीत. अशात वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमने लोकसहभागातून जंगलात पाणवठे तयार करण्याची तयारी दर्शविली असून, त्यांच्या या निर्णयाचे उपवनसंरक्षकांनी समर्थन करीत त्यांना जंगली भागांत पाणवठे तयार करण्यास परवानगी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे जंगलातील जिवांसाठी लवकरच पाणवठे तयार करण्याचे कामही सुरू होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरwildlifeवन्यजीव