सासूस तीन वर्षांचा कारावास

By Admin | Updated: January 3, 2015 01:19 IST2015-01-03T01:19:42+5:302015-01-03T01:19:42+5:30

आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी आरोपी सासूला तीन वर्षाची सश्रम कारावास.

Detective sentenced to three years | सासूस तीन वर्षांचा कारावास

सासूस तीन वर्षांचा कारावास

वाशिम : मानसिक व शारीरिक छळ करुन सुनेला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी आरोपी पंचफुला रामदास डाळ या सासूला तीन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश वि.रा. सिकची यांनी आज (दि. २) सुनावली. सदर घटना वाशिम येथे घडली होती.
स्थानिक शुक्रवार पेठ परिसरात सन २९ जुलै २0११ रोजी घडलेल्या घटनेतील मृतक स्नेहा रवि डाळ हिने आपल्या मृत्यूपूर्व बयानात शेतातील कामधंदा बरोबर येत नाही, या कारणावरुन सासूच्या वारंवार मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून आपण रॉकेल अंगावर घेऊन स्वत:ला पेटवून घेतले, असे म्हटले होते. या घटनेप्रकरणी पती रवि रामदास डाळ, सासू पंचफुला रामदास डाळ व आजीसासू शशिकला डिगांबर वैद्य रा. कलबुर्गा हिंगोली विरुद्ध कलम ३0२, ४९८ अ, ३0६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने एकूण दहा साक्षीदार तपासले. साक्षी-पुरावा व एकंदरीत परिस्थितीवरून दोषी आढळून आल्यामुळे सासू पंचफुलाबाई डाळ हिस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वि.रा. सिकची यांनी कलम ४९८ अ व कलम ३0६ अन्वये प्रत्येकी तीन वर्ष कारावास व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अँड. अरुण सरनाईक यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Detective sentenced to three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.