चोरी प्रकरणी आरोपी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 19:27 IST2017-09-10T19:27:04+5:302017-09-10T19:27:16+5:30
मानोरा : ट्रॅक्टरमधील बॅटरी चोरून नेणा-या आरोपीस मानोरा पोलिसांनी रविवारी सोमनाथनगर येथून ताब्यात घेतले. बबन रामजी जाधव असे आरोपीचे नाव आहे.

चोरी प्रकरणी आरोपी ताब्यात
ठळक मुद्देट्रॅक्टरमधील बॅटरी चोरणा-यास घेतले ताब्यातमानोरा पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : ट्रॅक्टरमधील बॅटरी चोरून नेणा-या आरोपीस मानोरा पोलिसांनी रविवारी सोमनाथनगर येथून ताब्यात घेतले. बबन रामजी जाधव असे आरोपीचे नाव आहे.
तालुक्यातील सोमनाथनगर येथील फिर्यादी प्रदीप रामदास राठोड यांचा ट्रॅक्टर त्यांच्या घरासमोर उभा असताना ४ सप्टेंबर रोजी बबन जाधव याने ट्रॅक्टरमधील बॅटरी चोरून नेली होती. याप्रकरणी प्राप्त फिर्यादीवरून बीट जमादार सुभाष महाजन, संदीप बरडे यांनी तपास करीत १० सप्टेंबर रोजी आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी भादंवी कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला.