नऊ कोटी मंजूर होऊनही कारंजा-धनज रस्त्याचे काम होईना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:11 IST2021-01-08T06:11:20+5:302021-01-08T06:11:20+5:30
धनज बु-कारंजा हा १७ किलोमीटर अंतराचा रस्ता जवळपास ८ गावांतील हजारो ग्रामस्थ आणि चालकांसाठी महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर एसटी ...

नऊ कोटी मंजूर होऊनही कारंजा-धनज रस्त्याचे काम होईना!
धनज बु-कारंजा हा १७ किलोमीटर अंतराचा रस्ता जवळपास ८ गावांतील हजारो ग्रामस्थ आणि चालकांसाठी महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर एसटी महामंडळाच्या बसगाड्यांसह विविध खासगी प्रवासी आणि मालवाहू वाहने सतत धावतात. धनजमार्गे अमरावतीकडे जाणाऱ्या वाहनांचाही यात समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाल्याने या रस्त्यावरून समृद्धी मार्गाच्या कामासाठी गौण खनिजाची वाहतूक सुरू झाली. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून त्याची चाळणी झाली आणि ग्रामस्थांसह वाहनचालकांना मोठा त्रास होऊ लागला. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली. त्याची दखल घेत आमदार राजेंद्र पाटणी यांन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून रस्ता कामासाठी ९ कोटी रुपये मंजूर करून घेतले; परंतु अद्यापही या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही.