वंचित शेतकऱ्यांनाही मिळणार पीक नुकसानभरपाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 04:37 PM2020-06-30T16:37:18+5:302020-06-30T16:40:28+5:30

वाशिम : राज्यात आॅक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘क्यार व महा’ चक्रिवादळ, अवेळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांतील शेतीपिकांचे ...

Deprived farmers will also get crop loss compensation | वंचित शेतकऱ्यांनाही मिळणार पीक नुकसानभरपाई 

वंचित शेतकऱ्यांनाही मिळणार पीक नुकसानभरपाई 

Next
ठळक मुद्देआॅक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये झाले होते नुकसानअमरावती विभागाला ७०.८ कोटी मिळाले.

वाशिम : राज्यात आॅक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘क्यार व महा’ चक्रिवादळ, अवेळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांतील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानभरपाईपासून वंचित असलेल्या शेतकºयांसाठी महसूल विभागाने २९ जून रोजी राज्यातील चारही महसूल विभागासाठी ३२६ कोटी २२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, यामध्ये अमरावती विभागाला ७० कोटी ८ लाख २४ हजार रुपये मिळाले आहेत.
राज्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘क्यार व महा’ चक्रिवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अवकाळी पाऊस पडून राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांतील शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते.  नुकसानापोटी यापूर्वी तीन टप्प्यात शासनाकडून निधी मिळालेला आहे. परंतू, यामधूनही अनेक शेतकरी वंचित राहिल्याने राज्यातील पुणे, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या चारही महसूल विभागाने शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी नोंदविली होती. सहा महिन्यानंतरही निधी मिळत नसल्याचे पाहून नुकसानभरपाईपासून वंचित असलेले शेतकरी तहसिल स्तरावर चकरा मारीत होते. शेवटी २९ जून रोजी महसूल विभागाने नुकसानभरपाईपोटी चार महसूल विभागाकरीता ३२६ कोटी २२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.  यामध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांना ७० कोटी ८ लाख २४ हजार रुपये मिळणार असून, यामध्ये वाशिम जिल्हा १३ कोटी ६७ लाख ८५ हजार, बुलडाणा दोन कोटी १४ लाख ६३ हजार, अकोला नऊ कोटी ८९ लाख २४ हजार, अमरावती ११ कोटी ८ लाख ८२ हजार, यवतमाळ जिल्ह्याकरीता ३३ कोटी २७ लाख ७० हजाराच्या निधीचा समावेश आहे. या निधीमधून लवकरच वंचित शेतकºयांना नुकसाभरपाईची रक्कम दिली जाणार आहे.

Web Title: Deprived farmers will also get crop loss compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.