तडीपार केलेला आरोपी फरारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:42 IST2021-04-27T04:42:50+5:302021-04-27T04:42:50+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळेबाबत उपविभागीय दंडाधिकारी मंगरुळपीर एस.वि. मुळे यांचे आदेश फौजदारी कलम ५६ (अ ) ...

तडीपार केलेला आरोपी फरारच
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळेबाबत उपविभागीय दंडाधिकारी मंगरुळपीर एस.वि. मुळे यांचे आदेश फौजदारी कलम ५६ (अ ) ( ब ) मु.पो कायदा मौजे मंगरुळपीर अन्वये १२/४/२०२१ पासून वाशिम जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्याचा आदेश प्राप्त झाला. त्या अनुषगाने काळे यांना पो. स्टे. ला बोलावून घेऊन ठाणेदार धनजंय जगदाळे यांच्यासमक्ष आदेशाची प्रत तामील करण्यात आली. त्यांचा प्रश्न उत्तर फाॅर्म भरून घेण्यात आला असता हद्दपारी काळात ते कोठे राहणार यांचा जबाब नोंदविला असता त्यांचे नातेवाईक पातूर जि . अकोला येथे राहणार असल्याचे सांगितले. परंतु यानंतर तो पोलिसांकडे न येता फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत असून नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे तसेच त्याला सहकार्य करणाऱ्यांवरसुद्धा कारवाई केली जाऊ शकते असे पोलिसांनी सांगितले.