उंबर्डाबाजार येथे आढळला डेंग्यूचा रूग्ण
By Admin | Updated: September 13, 2014 23:38 IST2014-09-13T23:12:25+5:302014-09-13T23:38:39+5:30
गावक-यात खळबळ : आरोग्य विभाग अनभिज्ञ.

उंबर्डाबाजार येथे आढळला डेंग्यूचा रूग्ण
उंबर्डाबाजार : आरोग्य तथा ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून, गावातील एका १0 वर्षीय मुलाला डेंग्यूची लागण झाल्याचे कळल्याने ग्रामवासीयात खळबळ उडाली असून, आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.
तेलीपुरा भागातील सुनील देवराव पचगाडे यांचा १0 वर्षाचा मुलगा मयूर यास अचानक ताप आल्यामुळे त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. परंतु ताप कमी झाला नसल्याने त्याला यवतमाळ येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे सांगण्यात आल्याने रहिवाशामध्ये खळबळ उडाली आहे.
आरोग्य विभागाने गावातील आजारी रूग्णांचे रक्तांचे नमुने घेण्याची व तसेच गावात साफसफाईसाठी ग्रामपंचायत प्रशासनाला परावृत्त करून गावात धुळफवारणी करण्याची मागणी गावकर्यांनी केली आहे.