हिंगणवाडीच्या बालकाचा मूर्तिजापूर येथे डेंग्यूने मृत्यू
By Admin | Updated: December 12, 2014 00:35 IST2014-12-12T00:35:46+5:302014-12-12T00:35:46+5:30
१२ वर्षीय बालकाचा डेंग्युच्या आजाराने उपचारादरम्यान मृत्यू.
_ns.jpg)
हिंगणवाडीच्या बालकाचा मूर्तिजापूर येथे डेंग्यूने मृत्यू
धनज बु. (वाशिम): येथून जवळच असलेल्या हिंगणघाट येथील प्रज्ज्वल विलास कांबळे या १२ वर्षीय बालकाचा डेंग्युच्या आजाराने मूर्तिजापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १0 डिसेंबर रोजी घडली. हिंगणवाडी येथील शेतमजूर विलास कांबळे यांचा १२ वर्षीय मुलगा प्रज्ज्वल यास ९ डिसेंबर रोजी ताप आल्याने त्याच्यावर धनज येथील प्रा थमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यानंतरही ताप न उ तरल्याने त्याला मूर्तिजापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला होता.