शासकीय सुटीमुळे लोकशाही दिन मंगळवारी!
By Admin | Updated: April 28, 2017 11:44 IST2017-04-28T11:44:12+5:302017-04-28T11:44:12+5:30
१ मे २०१७ रोजी येणाºया सोमवारी शासकीय सुटी असल्यामुळे लोकशाही दिनाचे आयोजन मंगळवार, २ मे रोजी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने बुधवारी कळविली.

शासकीय सुटीमुळे लोकशाही दिन मंगळवारी!
वाशिम : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. मात्र, १ मे २०१७ रोजी येणाऱ्या सोमवारी शासकीय सुटी असल्यामुळे लोकशाही दिनाचे आयोजन मंगळवार, २ मे रोजी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने बुधवारी कळविली.
लोकशाही दिनामध्ये विहित नमुन्यातील अर्जाद्वारे तक्रार सादर करणे आवश्यक आहे. या अर्जाचा नमुना विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येईल. लोकशाही दिनात दाखल करावयाची तक्रार ही वैयक्तिक स्वरुपाची असावी, सार्वजनिक स्वरुपाची तक्रार लोकशाही दिनामध्ये दाखल करता येणार नाही. तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व प्रकरणे, अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक तक्रार लोकशाही दिनात स्वीकारली जाणार नाही. तालुका स्तरावरील लोकशाही दिनात अर्ज दिल्यानंतर १ महिन्याने जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात अर्ज करता येईल, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.