महावितरणकडून मागण्या मान्य; शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST2021-03-18T04:41:22+5:302021-03-18T04:41:22+5:30
रिसोड, मालेगाव तालुकासह जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या शेतातील वीज कनेक्शन हे कुठलीही पूर्वसूचना न देता तोडणे विद्युत महामंडळकडून सुरू ...

महावितरणकडून मागण्या मान्य; शेतकऱ्यांना दिलासा
रिसोड, मालेगाव तालुकासह जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या शेतातील वीज कनेक्शन हे कुठलीही पूर्वसूचना न देता तोडणे विद्युत महामंडळकडून सुरू होते. उन्हाळी मूगसह इतर पिके ऐन पाण्यावर असताना सुरू झालेली ही कारवाई शेतकरी बांधवांना अन्यायकारक होती. त्यातच वीज वापरापेक्षा आलेले अतिरिक्त बिल यामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले होते. याविरोधात ॲड.नकुल देशमुख यांनी महावितरणविरोधात आक्रमक हाेत आणि शेतकरी बांधवँना होणारा त्रास आणि अन्याय आम्ही सहन करणार नाही. लवकरात लवकर शेतकरी बांधवांचे वीज कनेक्शन जोडून वीजबिल भरण्यासाठी विशेष आणि शेतकऱ्यांना सोईची होईल अशी व्यवस्था करावी, अन्यथा चक्का जाम करून महावितरण कार्यालय बंद करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता. यासाठी १८ मार्चची मुदत दिली गेली होती. तत्पूर्वी महावितरण अधिकारी यांनी शेतकरीहिताची भूमिका घेत शेतकरी बांधवांचे तोडलेले सर्व वीज कनेक्शन जोडले जातील, ३००० रुपये भरून बाकी बिल सवलतीने भरणा करता येईल,अशी सूट दिली. पंचायत समिती रिसोड येथे ॲड. नकुल देशमुख यांची महावितरण अधिकारी फुलझडे यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीत ह्या मागण्या मान्य करण्यात आल्या. यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. यावेळी वाशिम जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष गजाननराव लाटे, रिसोड पंचायत समिती सभापती सुभाषराव खरात, नारायणराव सानप, महावितरण कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.