कामगार कल्याण मंडळातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:45 IST2021-09-06T04:45:27+5:302021-09-06T04:45:27+5:30
निवेदनानुसार, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील अर्धवेळ कर्मचारी योजना राबविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत; परंतु आजवर राज्य शासनाने व मंडळ ...

कामगार कल्याण मंडळातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित
निवेदनानुसार, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील अर्धवेळ कर्मचारी योजना राबविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत; परंतु आजवर राज्य शासनाने व मंडळ प्रशासनाने व मंडळ प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. अर्धवेळ कर्मचाऱ्यांना सन २०१७ पासून पूर्णवेळ पदोन्नती दिली नाही, ती सुरळीत करण्यात यावी, अर्धवेळ कर्मचाऱ्यांना किमान वेतन योजना लागू करावी, कर्मचाऱ्यांची विभागवार नव्याने ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी, त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार पूर्णवेळ कर्मचारी पदावर बढती देण्यात यावी, अर्धवेळ कर्मचारी म्हणून त्यांना बजावलेल्या सेवेचा अर्धकालावधी या कर्मचाऱ्यांना बढती दिल्यानंतर सेवेत संलग्न करण्यात यावा, अर्धवेळ कर्मचाऱ्यांना अनुकंपा योजना लागू करण्यात यावी, तसेच या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्यात यावा आदी प्रमुख मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या.
०००००००००००००
मान्य होईपर्यंत लढा सुरूच
अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित असल्याने त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या मागण्या वरिष्ठांनी मान्य कराव्या. मागण्या मान्य होईपर्यंत संघटनेचा लढा सुरूच राहील, प्रसंगी तीव्र आंदोलनदेखील करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.