उमेदवारीसाठी महिलांची पक्षनेतृत्वाकडे मागणी
By Admin | Updated: September 6, 2014 00:02 IST2014-09-05T23:44:17+5:302014-09-06T00:02:15+5:30
वाशिम जिल्ह्यातील तीनही मतदार संघात ७ महिला इच्छूक.

उमेदवारीसाठी महिलांची पक्षनेतृत्वाकडे मागणी
वाशिम : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघासाठी महिला इच्छूक आहेत परंतु त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने वाशिम व रिसोड विधानसभा मतदार संघातून इच्छूक असलेल्या महिलांनी माघार घेतली. त्यांनी प्रयत्न केले मात्र निष्फळ ठरले. कारंजा विधानसभा म तदार संघातील दोन राजकीय पक्षाच्या इच्छूक महिला उमेदवारांनी मात्र थेट मुख्यमंत्री यांची भेट घेतली तर येथे आलेल्या पक्षनिरिक्षकांनाही निवेदन देवून महिला उमेदवार उभे करण्याची मागणी केली आहे.
सुरूवातील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले तेव्हा तीनही विधानसभा मतदार संघात ७ महिला निवडणूक लढविण्यास इच्छूक होत्या. यामध्ये वाशिम विधानसभा मतदार संघातून ४, कारंजा विधानसभा मतदार संघातून २ तर रिसोड विधानसभा मतदार संघातून २ यांचा समावेश होता. मात्र यानं तर पक्षाच्यावतिने व पदाधिकार्यांनी पुढाकार न घेतल्याने इच्छूक महिलांची मागणी मागे पडली. काही दिवसाआधी एका वाशिम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा काँग्रेसच्या नेत्या यांनी थेट मुख्यमंत्री यांची भेट घेवून याबाबत चर्चा केली तसेच पक्ष निरिक्षकांना भेटूनही आपले मत व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्याही एका महिला नेत्या व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी सुध्दा पक्षङ्म्रेष्ठीकडे कारंजा विधानसभा मतदार संघात महिला उमेदवार देण्याची मागणी केली होती मात्र त्यांनी यानंतर पुढे कोणतेच पाऊल उचलले नसल्याने त्यांची मागणी केवळ मागणीच राहिली. उमेदवारी मिळो अथवा न मिळो मात्र कारंजा विधानसभा मतदार संघात महिलांनी उमेदवारीसाठी फिल्डींग लावल्याने अनेक इच्छूक पुरूष उमेदवारांमध्ये खळबळ माजली आहे. तसेच प्रत्येक जिल्हयात किमान एका तरी महिलेला विधासभेचे तिकीट द्यावे असा आग्रह कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील काही महिलांनी मागणी केली आहे.
जिल्हयात ८ लाख ४९ हजार जवळपास मतदार आहे त्यात महिला ४ लाख मतदार असताना गेल्या ५0 वर्षात केवळ बोटावर मोजण्याइतपत महिलांनाच विधानसभेवर जाण्याची संधी मिळाली. महिलांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिल्यास त्याही विधानसभेत जाऊ असे बोलल्या जाते.