वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:29 IST2021-06-05T04:29:21+5:302021-06-05T04:29:21+5:30
सामाजिक न्याय विभागाने २५ मे रोजी परिपत्रक निर्गमित करुन दिव्यांगांना लसीकरण केंद्रापर्यंत जाण्याकरिता आवश्यक वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे ...

वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी
सामाजिक न्याय विभागाने २५ मे रोजी परिपत्रक निर्गमित करुन दिव्यांगांना लसीकरण केंद्रापर्यंत जाण्याकरिता आवश्यक वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच दिव्यांगांना लसीकरणासंदर्भात आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली. जिल्ह्यामध्ये दिव्यांग नागरिक, दिव्यांग ज्येष्ठ नागरिक या सर्वांना निवासापासून लसीकरण केंद्रापर्यंत जाणे-येणेकरिता वाहतूक व्यवस्था करणे, रस्त्याच्या कडेला खुल्या मैदानात पाल लावून राहणारे भिक्षेकरी, बेघर नागरिक तसेच परप्रांतीय मजुरांची व्यवस्था करणे. या घटकांची ऑफलाईन नोंदणी करणे, जे दिव्यांग व ज्येष्ठ दिव्यांग जिना चढउतार करु शकत नाहीत, अशा ठिकाणी बसण्याची व्यवस्था करुन त्याच ठिकाणी येऊन आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण करणे आवश्यक आहे.
हृदयरोग, किडनीचा आजार, उच्च रक्तदाब, अर्धांगवायू, कर्करोगाने ग्रस्त असलेल्या नागरिकांना गृहभेटी देऊन लसीकरण होणे आवश्यक आहे. यासंदर्भात संबंधित विभाग प्रमुखांना आवश्यक सूचना द्याव्यात. लसीकरणापूर्वी व नंतर जिल्ह्याच्या ग्रामीण, नागरी क्षेत्रामध्ये असलेल्या दिव्यांग घटकांची पात्र लाभार्थ्यांची संख्या निश्चित करणे. त्यानुसार नियोजन करणे प्रशासनाला सहज सुलभ होईल. समाजहित साधण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित विभागाला निर्देशित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.