हातपंप सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:30 IST2021-06-02T04:30:32+5:302021-06-02T04:30:32+5:30
............. धान्य मिळत नसल्याने लाभार्थ्यात राेष वाशिम : मालेगाव तालुक्यातील जवळपास १०० लाभार्थींची नावे शिधापत्रिकांमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आली ...

हातपंप सुरू करण्याची मागणी
.............
धान्य मिळत नसल्याने लाभार्थ्यात राेष
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जवळपास १०० लाभार्थींची नावे शिधापत्रिकांमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. मात्र, या लाभार्थींना रेशनवर धान्य मिळत नसल्याने नाराजीचा सूर उमटत असून राेष व्यक्त करीत आहेत.
..............
नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी
वाशिम : जुने शहरातील पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी बुधवारी केली.
..............
लाेकसहभागातून शेततळे
वाशिम : तपोवन ग्रामपंचायतीने गेल्यावर्षी पाणी फाउंडेशनमध्ये सहभाग घेत लोकसहभाग व श्रमदानातून तयार केलेल्या शेततळ्यात आज रोजी जलसाठा असून, या जलसाठ्यामुळे गुराढोरांची पाण्याची साेय हाेत आहे.
.............
विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिर असली तरी, कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन आराेग्य विभागाकडून हाेत आहे.
..............
वाहनांअभावी प्रवाशांची गैरसोय
वाशिम : जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून निर्बंध लागू आहेत. यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक घराबाहेरच पडणे टाळत आहेत; मात्र काही लोकांना कामानिमित्त प्रवास करावा लागत असून त्यांची गैरसोय होत आहे.