शासकीय रुग्णालयांत बालकांसाठी वेगळे कोविड सेंटर उभारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:42 IST2021-05-18T04:42:47+5:302021-05-18T04:42:47+5:30

शासकीय आरोग्य संस्थामधील अंतर्बाह्य स्वच्छता असणे, आवारातील स्वच्छतागृह, शाैचालय या ठिकाणी घाण पसरलेली असते. याकडे विशेष लक्ष पुरवून कार्यवाही ...

Demand for setting up of separate covid centers for children in government hospitals | शासकीय रुग्णालयांत बालकांसाठी वेगळे कोविड सेंटर उभारण्याची मागणी

शासकीय रुग्णालयांत बालकांसाठी वेगळे कोविड सेंटर उभारण्याची मागणी

शासकीय आरोग्य संस्थामधील अंतर्बाह्य स्वच्छता असणे, आवारातील स्वच्छतागृह, शाैचालय या ठिकाणी घाण पसरलेली असते. याकडे विशेष लक्ष पुरवून कार्यवाही होणे आवश्यक आहे. रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, रुग्णांना व काळजीवाहक नातेवाईकांना पिण्याचे पाणी कायम विकत घ्यावे लागते. पाण्याची सोय कायमस्वरुपी व्हावी. ही कायम सुविधा होईपर्यत पिण्याचे पाणी टँकरव्दारे पुरविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. कोरोना महामारीमध्ये तिसरी लाट येत असल्याची व त्यामध्ये शून्य ते १० वर्षे वयोगटाचे बालकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. तशी परिस्थिती उद्भवण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय व उपचार करण्याकरिता बालकांकरिता नवीन कोविड सेंटर उभारण्यात यावे. सकारात्मक विचार व प्रयत्नांची गरज आहे. ही कार्यवाही झाल्यास ऐनवेळेस गैरसोय होणार नाही व बाधितांची संख्या वाढणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Demand for setting up of separate covid centers for children in government hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.