७५ टक्के अनुदानावर बियाणे देण्याची मागणी
By Admin | Updated: May 17, 2014 23:12 IST2014-05-17T21:42:55+5:302014-05-17T23:12:30+5:30
शेतकर्यांना ७५ टक्के अनुदानावर बी-बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करून देण्याची मागणी

७५ टक्के अनुदानावर बियाणे देण्याची मागणी
मानोरा : निसर्गाच्या प्रकोपामुळे मानोरा तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यातील शेतकर्यांना आर्थिक मदतीसह ७५ टक्के अनुदानावर बी-बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी शेतकर्याकडून केली जात आहे. २0१३ च्या पावसाळ्यात सुरूवातीला जास्त पाऊस झाला. त्यामुळे शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यातच यावर्षी रब्बी पिकांच्या हंगामात झालेली गारपीट व अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला. या संकटातून सावरण्यासाठी शासनाने अत्यंत तोकडी मदत देवून शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शासनाने ७५ टक्के अनुदानावर बि-बियाणे व रासायनिक खते वाटप करावी व त्यांच्यासमोर निर्माण झालेला प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.