गारपिटीमुळे नुकसान भरपाईसाठी ६.८४ कोटींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST2021-04-06T04:40:50+5:302021-04-06T04:40:50+5:30
मार्चमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन वाशिम तालुक्यातील ६ महसुली मंडळातील ३५ गावांमध्ये १९८९ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, गहू, हरभरा, ...

गारपिटीमुळे नुकसान भरपाईसाठी ६.८४ कोटींची मागणी
मार्चमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन वाशिम तालुक्यातील ६ महसुली मंडळातील ३५ गावांमध्ये १९८९ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, गहू, हरभरा, मूग, ज्वारी, तीळ, भूईमुग, मका, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. मालेगाव तालुक्यातील ६ महसुली मंडळातील ३८ गावांमध्ये १६९५ हेक्टर, रिसोड तालुक्यातील ३ महसुली मंडळातील २३ गावांमध्ये ५१९ हेक्टर, मंगरूळपीर तालुक्यातील २ महसुली मंडळातील १६ गावांमध्ये २७४ हेक्टर, मानोरा व कारंजा तालुक्यातील ९ महसुली मंडळांतील २५ गावांमध्ये ५०६ हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित झाले.
दरम्यान, या पिकांसाठी १३ मे रोजी पारित झालेल्या शासन निर्णयानुसार प्रतिहेक्टर १३ हजार ५०० रुपये मदत देय आहे. त्यानुषंगाने ६ कोटी ७३ लाख १० हजार ४६० रुपये मदतनिधीची गरज आहे. यासह ६३ हेक्टरवर नुकसान झालेल्या संत्रा, लिंबू आणि आंबा या पिकांकरिता १८ हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे ११ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा मदतनिधी आवश्यक आहे. तशी मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नोंदविली आहे.
...........................
बाॅक्स :
१४७ गावांमध्ये झाले नुकसान
वाशिम तालुक्यातील ३५, मालेगाव ३८, रिसोड २३, मंगरूळपीर १६, मानोरा १७ आणि कारंजा तालुक्यातील १८ अशा एकूण १४७ गावांमधील कांदा, गहू, हरभरा, मूग, ज्वारी, सोयाबीन, मका, भाजीपाला, संत्रा, लिंबू, आंबा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे ६ हजार ९१२ शेतकरी बाधित झाले आहेत.
......................
नुकसानग्रस्त क्षेत्र व बाधित शेतकरीसंख्या
वाशिम तालुका - १९९८ हे./२१८४
मालेगाव तालुका - १७११ हे./२०२८
रिसोड तालुका - ५३५ हे./१६७७
मंगरूळपीर तालुका - २९४/३७०
मानोरा तालुका - ४६४/५८०
कारंजा तालुका - ४४/७३