रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:46 IST2021-08-25T04:46:41+5:302021-08-25T04:46:41+5:30
ग्रामपंचायत आमदरीच्या सरपंचांनी निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की, भूमिहीन व स्थलांतरित मजुरांसाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे ...

रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी
ग्रामपंचायत आमदरीच्या सरपंचांनी निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की, भूमिहीन व स्थलांतरित मजुरांसाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे उपलब्ध करून देण्याची मागणी पत्र देऊन केली होती. तहसीलदारांना २९ जून २०२० ला महाराष्ट्र रोहयोची कामे सुरू करण्यासाठी मजुरांनी कामाची मागणी करून नमुना क्रमांक ४ अर्ज भरून संयुक्तमध्ये १२६ मजुरांच्या स्वाक्षरीनिशी कार्यालयात यादी प्राप्त केली आहे. तरी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे कामे वन विभागाने आमदरी येथे चालू केलेले नाही. स्थलांतरित व भूमिहीन मजूर यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येत आहे. याची दखल घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी मानोरा यांना रोजगार हमीची कामे उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्देशित करण्याची मागणी सरपंचांनी केली आहे.