‘फेलोशिप’ची जाहिरात काढण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:39 IST2021-05-16T04:39:51+5:302021-05-16T04:39:51+5:30
यासंदर्भातील निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमधील पीएचडी व एम.फील संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनाकरिता प्रोत्साहन व आर्थिक सहाय्याच्या ...

‘फेलोशिप’ची जाहिरात काढण्याची मागणी
यासंदर्भातील निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमधील पीएचडी व एम.फील संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनाकरिता प्रोत्साहन व आर्थिक सहाय्याच्या स्वरूपात अधिछात्रवृत्ती देण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्याना संशोधन करताना आर्थिक अडचण जाणवत नाही; मात्र २०१९ पासून बार्टी संस्थेने एमफील संशोधक विद्यार्थ्यांसाठी फेलोशिपची जाहिरातच प्रसिध्द केली नाही. तसेच २७ जानेवारी २०२१ रोजी बार्टी संस्थेकडून जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, त्यात केवळ पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला. दरम्यान, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील विद्यापिठात एमफील अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या ७० संशोधक विद्यार्थ्यांच्या सह्यांचे निवेदन रिसोड तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, राज्यपाल, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री आणि डॉ.बाबसाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांना पाठविण्यात आले.
निवेदनावर गणेश धांडे, सोनाजी गवई, अमोल मोरे, विश्वास ढोबळे, समाधान अंभोरे, रेखा साळवे, शून्यात सावंत, सोनाली अवसरमोल यांच्यासह इतर संशोधक विद्यार्थ्यांच्या स्वाक्षर्या आहेत.