रेशन धान्य देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST2021-08-26T04:43:38+5:302021-08-26T04:43:38+5:30
०००० रोहित्रांना संरक्षक कठड्याचा अभाव वाशिम : जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत रोहित्रांचे बॉक्स उघडे असून, संरक्षक कठड्याचा अभाव असल्याने ...

रेशन धान्य देण्याची मागणी
००००
रोहित्रांना संरक्षक कठड्याचा अभाव
वाशिम : जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत रोहित्रांचे बॉक्स उघडे असून, संरक्षक कठड्याचा अभाव असल्याने अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे महावितरणने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
०००००
विमा संरक्षण केव्हा मिळणार?
वाशिम : रोजगार हमी योजनेवर कार्यरत मजूर, रोजगार सेवक यांना विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी प्रशासनामार्फत राज्य शासनाकडे वारंवार करण्यात आली. अद्याप विमा संरक्षण देण्यात आले नाही.
००००००००
शिरपूर येथे ग्रामीण रुग्णालयाची मागणी
वशिम : शिरपूर जैन येथील आरोग्य वर्धिनी केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी करणारा ठराव मालेगाव पंचायत समितीच्या मासिक सभेत यापूर्वीच मंजूर झाला. मात्र, यावर अद्याप कार्यवाही नाही. शिरपूर येथे ग्रामीण रुग्णालयाची मागणी होत आहे.
०००००
आरोग्य विभागातर्फे मार्गदर्शन
वाशिम : व्हायरल फिव्हरपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत आरोग्य विभागातर्फे चिखली परिसरात मार्गदर्शन करण्यात आले.